विश्वभरारी आयोजित भरारी प्रकाशनची ट्रिपल सेंचुरी; पुस्तक प्रकाशन सोहळा
विश्वभरारी आयोजित भरारी प्रकाशनची ट्रिपल सेंचुरी; पुस्तक प्रकाशन सोहळा
भरारी प्रकाशन निर्मित ३०० व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ येथे पार पडला.
लता गुठे लिखित 'स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना' आणि स्मिता भागवत लिखित 'संचित संस्कृतीचे' या पुस्तकांचे प्रकाशन आदरणीय कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव एस एन डी टी महिला विद्यापीठ यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी व्यासपीठावर माध्यम सल्लागार जयु भाटकर, आमदार पराग अळवणी, भारत विकास परिषद विलेपार्लेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या आधी 'जगणं आमचं' गप्पांचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सहभाग होता, प्रकाशिका लेखिका लता गुठे, वीरमाता अनुराधा गोरे आणि सीनियर इन्स्पेक्टर रेणुका बुवा. विशेष सहभाग होता जयु भाटकर यांचा.
जयु भटकर यांनी विचारलेल्या प्रश्नांतून तिघींचाही थोडक्यात पण मुद्देसूद आयुष्याचा प्रवास उलगडला गेला. त्यानंतर प्रकाशनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. याप्रसंगी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये अतिशय सुरेख मार्गदर्शन केले आणि लता गुठे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचेही कौतुक केले आणि हे पुस्तक किती महत्त्वाचे आहे हेही आवर्जून सांगितले.
जयु भाटकर यांनी स्मिता भागवत लिखित 'संचित संस्कृतीचे' व लता गुठे लिखित 'स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना' या दोन्हीही पुस्तकावर छान विवेचन केले.
आमदार पराग अळवणी त्यांच्या मनोगत म्हणाले, लता गुठे ह्या गेली सात वर्षे सातत्याने एक सामाजिक जबाबदारी या उद्देशाने प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला क्रांतिवीरांच्या कार्यावर आधारित पुस्तक प्रकाशित करत आहेत. भरारी प्रकाशनच्या माध्यमातून शहीद क्रांतिवीरांना या पुस्तकांद्वारे आदरांजली त्या देतात. त्यांचं कार्य समाजासमोर आणण्याचे काम लताताई गुठे करत आहेत. 'स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना' या पुस्तकातून त्यांनी अनेक भागातील वेगवेगळ्या महिलांनी क्रांतीलढ्यात जे मोलाचे योगदान दिले त्यांची ओळख आजच्या आणि उद्याच्या पिढीला व्हावी यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहून क्रांती लढ्यातील महिलांचा इतिहास प्रकाशात आणला आहे. हे पुस्तक शाळेपर्यंत कॉलेजपर्यंत जायला हवे. अविनाश धर्माधिकारी यांनी भारत विकास परिषदेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.
स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना या पुस्तकातील एका व्यक्तिरेखेचे अभिवाचन संपदा पाटगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले. सभागृहामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment